सरकारी कर्मचाऱ्यांसाठी चिंतेची बाब मुख्यालयी राहत नसल्यास HRA घरभाडे भत्ता व वेतन बंद करण्याचे पत्र
राज्यात सरकारी सेवेत कर्मचारी शासन कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी वास्तव्य करण्यासाठी वेतनामध्ये घरभाडे भत्ता मिळत असतो. परंतु अनेक भागामधील नागरीक तसेच लोकप्रतिनिधी प्रशांत बंब यांच्याकडुन वारंवार तक्रार होते कि , कर्मचारी मुख्यालयी राहत नाहीत .यामुळे या विषयाकडे आता प्रशासनाने ठोस पाऊले उचलले आहेत . जे कर्मचारी मुख्यालयी राहणार नाहीत . अशा कर्मचाऱ्यांच्या वेतनामधुन घरभाडे भत्ताच थांबविण्याचे आदेश प्रशासनाकडुन निर्गमित करण्यात आले आहेत. बदनापूर तालुक्यातील कर्मचाऱ्यांचे सप्टेंबर पासून घरभाडे बंद करण्यात आले आहे. परंतु आता वेतन बंद करण्याचे पत्र प्रशांत बंब यांनी दिले आहेत. याबाबत औरंगाबाद जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांनी हायकोर्टात एक याचीका दाखल करण्यात आली आहे. परंतु आता वेतन बंद करण्याबाबत कार्यवाही काय होते हि चिंतेची बाब आहे
अनेक जिल्ह्यांत घरभाडे बंद करण्यात आले असून यावर आमदार प्रशांत बंब समाधानी नसुन जे कर्मचारी मुख्यालयी राहत नसेल त्या कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात येऊ नये असे पत्र गटविकास अधिकारी तहसिलदार गटशिक्षणाधिकारी यांच्या कडे दिले आहे. यामुळे आता खुप मोठ्या संकटाला राज्य कर्मचाऱ्यांना सामोरे जावे लागत आहे.लोकप्रतिनिच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना वेठिला धरण्याचे हे खुप मोठे शडयंत्र आहे
महाराष्ट्रात मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.निलेश गटणे यांनी सर्व विभागप्रमुखांना पत्र निर्गमित करुन निर्देश दिले आहे कि , जे कर्मचारी मुख्यालयी वास्तव्यास राहणार नाहीत . अशा कर्मचाऱ्यांना माहे सप्टेंबर महिन्यांपासुन घरभाडे भत्ता थांबविण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. शिवाय जे कर्मचारी शिक्षक मुख्यालयी राहणार नाहीत अशा कर्मचाऱ्यांवर शिस्तभंग विषयक कार्यवाही करण्याचे आदेश औरंगाबादचे सी.ई.ओ श्री.निलेश गटणे यांनी दिले आहेत. यासाठी आता कर्मचाऱ्यांना घरभाडे भत्ताचा लाभ घेण्यासाठी संबंधित ग्रामसभेचा ठराव प्राप्त करुन घ्यावा लागणार आहे. त्याचबरोबर भाडेच्या जागत राहत असल्याचे भाडेकरार केल्याचे दस्तऐवजाची कागतपत्रे सादर करावे लागणार आहे.
तसेच आता वेतन थांबविण्यासाठी कार्यवाही होणार कि नाही हा प्रश्न अधिकारी यांना नविन प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच कर्मचारी यांच्या मधे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
💢कर्मचाऱ्यांचे घरभाडे व वेतन बंद करण्याचे पत्र येथे डाउनलोड करा
💢बदली अपडेट बघण्यासाठी येथे सविस्तर वाचा
0 Comments