शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत मिळणारे अनुदान सुद्धा PFMS पीएफएमएस प्रणालीद्वारे मिळणार - संचालकांचे परिपत्रक.
शालेय पोषण आहार म्हणजेच मध्यान भोजन योजना ही देखील केंद्र शासनाची योजना आहे. त्यामुळे या योजनेअंतर्गत ज्या ज्या यंत्रणांना किंवा व्यक्तींना अनुदान प्राप्त होते अशा सर्व यंत्रणा व व्यक्ती यांना यानंतर प्राप्त होणारे अनुदान हे पी एफ एम एस प्रणालीद्वारे प्राप्त होणार आहे.
शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत शाळा स्तरावर विद्यार्थ्यांना गरम ताजा आहार उपलब्ध करून देण्यात येत आहे. सदर देवकांची अदागयी 100% पीएफएमएस प्रणालीमार्फत करावयाची असल्याने सदर कामकाजाकरिता आपल्या जिल्ह्यातील योजनेस पात्र व पी एफ एम एस प्रणालीवर नोंदणीकृत सर्व शाळांची सोबत जोडण्यात आलेल्या नमुन्यात माहिती शिक्षण संचालनलायस उपलब्ध करून देण्यात यावी. सदर माहिती जिल्हा लॉगिन वर उपलब्ध आहे. सदर माहिती केवळ इंग्रजीमध्ये तसेच एम एस एक्सेल फॉरमॅटमध्ये पाठवण्यात यावी.
सर्व जिल्ह्यांना सूचना आहे की सदरची माहिती शाळांना द्यायचे विहित वेळेत अदा करणे करिता आवश्यक असल्याने याबाबत विलंब होणार नाही याची योग्य ती दक्षता घ्यावी. ज्या जिल्ह्यांची माहिती प्राप्त होणार नाही अशा जिल्ह्यातील शाळांना अनुदान मिळण्यास विलंब झाल्यास त्यांची सर्व जबाबदारी संबंधितावर राहील याची गांभीर्याने नोंद घ्यावी.
💖संचालक परिपत्रक येथे डाउनलोड करा
💢MDM पैसे विभागणी बाबत अपडेट येथे वाचा
0 Comments