Breaking News : ऐन दिवाळी सणामध्ये , राज्य कर्मचाऱ्यांची मोठी भ्रमनिराशा !
महाराष्ट्र राज्य शासन सेवेत कार्यरत सर्व शासकीय , जिल्हा परिषद , इतर पात्र कर्मचारी व सेवानिवत्त पेन्शनधारक कर्मचाऱ्यांना माहे ऑक्टोंबर महिन्याचे वेतन / पेन्शन दिवाळी सणापुर्वी अदा करणेबाबत राज्य शासनाच्या वित्त विभागाकडुन दि.18.10.2022 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .सदर शासन निर्णयान्वये राज्य कर्मचाऱ्यांना माहे ऑक्टोंबर महिन्याचे वेतन / पेन्शन 21 ऑक्टोंबर पर्यंत अदा करण्याचे आदेश देण्यात आलेले होते .
महाराष्ट्र शासन वित्त विभागाच्या शासन निर्णयान्वये राज्यातील कर्मचाऱ्यांना ऑक्टोबर महिन्याचे वेतन / पेन्शन दिवाळी सण अग्रिमसह अदा करण्यात आलेले आहेत . परंतु दि.21.10.2022 रोजी शुक्रवार होता , तर ज्या विभागातील कर्मचाऱ्यांचे वेतन बिल अपुरे त्याचबरोबर राज्यातील काही विभागातील कार्यालयांना पुरेशी निधी उपलब्ध नसल्याने सदर आहरण संवितरण कार्यालयांना शुक्रवारी 2 वाजेनंतर निधी वितरीत करण्यात आला आहे . शनिवारी पासुन बँकेच्या कामकाजाला सुट्या सुरु झाल्याने बऱ्याच कर्मचाऱ्यांना दि.21.10.2022 पर्यंत वेतन / पेन्शन अदा करण्यात आले नाहीत .
आता राज्य कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी मिळणारे वेतन दिवाळीनंतर मिळणार आहे परंतू राज्य कर्मचाऱ्यांना यंदाची दिवाळी विनावेतन फक्त सण अग्रीम वर साजरी करावी करणार.
💢राज्य कर्मचाऱ्यांच्या वेतनात मोठी कपात सदर माहिती सविस्तर येथे वाचा
💢जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत अपडडेट येथे वाचा
💢राज्य कर्मचाऱ्यांना 38% महागाई भत्ता सविस्तर येथे वाचा
0 Comments