Subscribe Us

Old Pension : राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागु करणे संदर्भात, दि 24/10/22 चे महत्वपुर्ण पत्र.

 


Old Pension : राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागु करणे संदर्भात, दि 24/10/22 चे महत्वपुर्ण पत्र.


महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत संघटनेच्या माध्यमातून सतत प्रयत्न करत आहे. दि.01.11.2005 रोजी व त्यानंतर नियुक्त सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शनचे सर्व लाभ पूर्ववत लागु करणेबाबत, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना मार्फत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष मा.श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांना दि.24.10.2022 रोजी एक महत्वपुर्ण पत्र सादर केले आहे. या संदर्भातील महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे दि. 24.10.2022 रोजीचे सविस्तर पत्र पुढीलप्रमाणे पाहुयात.


जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत संघटनेच्या या पत्रामध्ये नमुद करण्यात आले आहे कि , राज्यात दि.01.11.2005 रोजी व त्यानंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शनचे सर्व लाभ बंद करण्यात आले आहेत .यातल्या त्यात त्यांना लागु करण्यात आलेल्या नविन पेन्शन योजनूतुन त्यांना मृत्यु व सेवानिवृत्ती नंतर कोणतीही पेन्शन मिळताना दिसत नाही. त्यामुळे राज्यातील असंख्य कर्मचाऱ्यांना त्यांच्या मृत्यु व सेवानिवृत्तीनंतरच्या जीवनज्ञापनाबाबत अतिशय असुरक्षितता निर्माण झाली आहे. ज्यातून कर्मचाऱ्यांना शासन विषयी असंतोष वाढत आहे , यामुळे महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांना सुद्धा राजस्थान व पंजाब सरकार प्रमाणे जुन्या पेन्शनचे सर्व लाभ लागु करुन त्याचे मृत्यू व सेवानिवृत्ती नंतरचे भविष्य सुरक्षित करणे गरजेचे आहे.


सदर पत्रामध्ये असेही नमुद करण्यात आले आहे कि , आपण नेहमी कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहीले आहात . त्यातुन कर्मचाऱ्यांना अनेक कल्याणकारी लाभ मिळाले आहेत. राज्यातील युवा कर्मचारी आपल्या खंबिर नेतृत्वाकडे आशेने पाहत आहेत. त्यामुळे या पत्राद्वारे मा.शरद पवार साहेब यांना विनंती करण्यात आली आहे कि , शासनाच्या सेवेत दि.01.11.2005 रोजी व त्यानंतर नियुक्त सर्व कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेचे सर्व लाभ पूर्ववत लागु करण्यासाठी स्वत : पुढाकार घेवून , राज्यातील लाखो कर्मचाऱ्यांचे भविष्य सुरक्षित व उज्ज्वल करावे. आज पर्यंत आपण शेतकरी व कर्मचारी यांना नेहमी सहकार्य करून त्यांच्या हिताची कामे केली आहे. सर्व महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांना आपणाकडून खुप अपेक्षा आहे. राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत शरद पवार साहेब यांनी सकारात्मक विचार निर्णय करणार असल्याचे सुतोवाच केले आहे..

💢जुनी पेन्शन लागू करणेबाबत 24/10/22 चे महत्त्वाचे पत्र येथे वाचा व डाउनलोड करा

💢शिक्षक बदली संवर्ग 1 बाबत माहिती येथे वाचा

💢राज्य कर्मचाऱ्यांच्या वेतनात मोठी कपात सविस्तर येथे वाचा

💢पंजाब सरकार ने जुनी पेन्शन लागू करणेबाबत महत्त्वाची अपडेट येथे वाचा


Post a Comment

0 Comments