राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय केंद्राप्रमाणे 60 वर्षे होणार
सेवानिवृत्त वय 60 वर्ष बाबत ,राज्य सरकार सकारात्मक असून येत्या काही दिवसांत निर्णय येणार आहेत . महाराष्ट्र राज्य शासन सेवेत कार्यरत शासकीय , जिल्हा परिषदा त्याचबरोबर इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयामध्ये वाढ करण्यात येणार आहे . महाराष्ट्र राज्य शासन सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय हे 58 वर्षे आहे , तर वर्ग – 4 कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे आहे .सेवानिवृत्तीच्या वयामध्ये वाढ केल्यास कर्मचाऱ्यांना दोन वर्षांची अतिरिक्त सेवेचा लाभ प्राप्त होणार आहे .
अगोदरच केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचे सेवानिृत्तीचे वय 60 वर्षे केल्याने , देशातील इतर 25 राज्य सरकारने राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करणेबाबत निर्णय घेण्यात आले आहेत . याच धर्तीवर महाराष्ट्र राज्य शासन सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करण्यात यावी अशी मोठी मोठी कर्मचाऱ्यांकडुन होत आहे . नुकतेच महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या वतीने दि.27 सप्टेंबर 2022 रोजी सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करणेबाबत , निवेदन सादर करण्यात आले आहेत . शिवाय जे कर्मचारी वयाने उशिरा शासन सेवेत रुजु झालेले आहेत . अशा कर्मचाऱ्यांना सेवेचा कालावधी कमी मिळतो .सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे केल्यास , कर्मचाऱ्यांना 2 वर्षे अधिकची सेवा मिळतो
त्याचबरोबर सध्या महाराष्ट्र शासन सेवेत अनेक पदे रिक्त आहेत , तसेच मागील तीन वर्षांपासुन कोणतीही मोठी पदभरती प्रक्रिया झालेली नाही . यामुळे कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष करणेबाबत राज्य सरकार देखिल सकारात्मक असून , या संदर्भात राज्य सरकारकडुन लवकरच मोठा निर्णय घेण्यात येणार आहे . कारण आतापर्यंत विविध कर्मचारी संघटनांकडुन सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करणेबाबत अनेक निवेदने राज्य सरकारला सादर करण्यात आले आहेत . शासन सेवेत असलेल्या अनुभवाने शासनाचा मोठा फायदा असल्याने शासनाने 60 वय सेविनिवृत्ती कालावधी वाढविण्यासाठी सकारात्मक असुन शासन स्तरावर चर्चा सुरू आहे.
💢दिवाळी सुट्टी बाबत सुधारित आदेश येथे वाचा
💢दिवाळी पुर्वी महागाई भत्ता व वाढीव सण अग्रीम मिळणार येथे वाचा
0 Comments