Subscribe Us

STARS MIEPA प्रकल्प मुख्याध्यापक सक्षमीकरण प्रशिक्षण अंतर्गत Online प्रशिक्षणाकरीता नावनोंदणी Registration करणेबाबत

 






STARS MIEPA प्रकल्प मुख्याध्यापक सक्षमीकरण प्रशिक्षण अंतर्गत Online प्रशिक्षणाकरीता नावनोंदणी Registration करणेबाबत


STARS MIEPA प्रकल्प मुख्याध्यापक सक्षमीकरण प्रशिक्षण अंतर्गत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय, शासकीय अनुदानित खाजगी, समाज कल्याण विभाग तसेच आदिवासी कल्याण विभागाच्या इयत्ता 1 ली ते 12 वी च्या शाळांमध्ये मुख्याध्यापक / प्राचार्य या पदावर कार्यरत असलेल्या व्यक्तींच्या Online प्रशिक्षणाकरीता नावनोंदणी (Registration) करणेबाबत. 


राज्यातील शालेय स्तरावर अध्ययन अध्यापन प्रक्रिया आणि अपेक्षित परिणाम याचे बळकटीकरण करण्या संदर्भात जागतिक बँक अर्थसहाय्यित केंद्रशासन पुरस्कृत Strengthening Teaching Learning And Results for Sates (STARS) या उपक्रमातील मुख्याध्यापक सक्षमीकरण प्रशिक्षण कार्यक्रमातंर्गत दिनांक 1 जून 2022 ते 17 जून 2022 या कालावधीत निवड करण्यात आलेले नोडल अधिकारी आणि जिल्हा/ तालुकास्तरीय प्रशिक्षक यांचे राज्यस्तरीय प्रशिक्षकांचे प्रशिक्षण (ToT) संपन्न झाले आहे.


 सदर उपक्रमातंर्गत सर्व  जिल्हयातील स्थानिक स्वराज्यसंस्था, शासकीय, शासकीय अनुदानित खाजगी, समाज कल्याण विभाग तसेच आदिवासी कल्याण विभागाच्या इयत्ता 1ली ते 12 वी च्या शाळांमध्ये मुख्याध्यापक / प्राचार्य या पदावर कार्यरत असलेल्या व्यक्तींचे FIRKI App च्या माध्यमातून Online प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे.


 जिल्हयातंर्गत स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय, शासकीय अनुदानित खाजगी, समाज कल्याण विभाग तसेच आदिवासी कल्याण विभागाच्या व्यवस्थापनाच्या शाळा/ विद्यालयामध्ये कार्यरत मुख्याध्यापक/ प्राचार्य (प्रभारी किंवा तात्पुरता प्रभार असलेले वगळून) यांना पुढे दिलेल्या Google link वर दिनांक 20 नोव्हेंबर 2022 पर्यंत नावनोंदणी (Registration)  करण्यात यावे. प्रत्यक्ष ऑनलाईन प्रशिक्षणाचे वेळापत्रक आणि इतर तपशिल स्वतंत्ररित्या आपणास पाठविण्यात येणार आहे . असे रमाकांत काठमोरे संचालक महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था, औरंगाबाद. यांनी पत्राद्वारे कळविले आहे 

💢STARS MIEPA प्रकल्प मुख्याध्यापक सक्षमीकरण प्रशिक्षण अंतर्गत Online प्रशिक्षणाकरीता नावनोंदणी Registration करणेबाबत येथे डाउनलोड करा

💢बदली अपडेट बघण्यासाठी येथे वाचा

👺शापोआ योजनेत बदल बाबत येथे सविस्तर वाचा

Post a Comment

0 Comments