Subscribe Us

गुड न्यूज... राज्य कर्मचाऱ्यांना 38% DA महागाई भत्ता जानेवारीच्या वेतनात मिळणार


गुड न्यूज... राज्य कर्मचाऱ्यांना 38% DA महागाई भत्ता जानेवारीच्या वेतनात मिळणार 

राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या घडीची मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे . ती म्हणजे राज्य कर्मचाऱ्यांना माहे जुन महिन्यापासून 38 टक्के दराने महागाई भत्ता अनुज्ञेय करणेबाबत राज्य शासनाकडुन मोठी हालचाल सुरु झालेली आहे .सध्या राज्य शासनाच्या हिवाळीला सुरुवात झालेली असुन अधिवेशनाचा शेवट गोड बातमीने होणार असल्याची बातमी समोर येत आहे .


महाराष्ट्र राज्यातील शासकीय / निमशासकीय , जिल्हा परिषद व इतर पात्र कर्मचारी त्याचबरोबर सेवानिवृत्त पेन्शनधारक कर्मचारी यांना केंद्र सरकार प्रमाणे वाढीव 4 टक्के डी.ए लाभ अनुज्ञेय करणेबाबत , मोठी बातमी समोर आलेली आहे .हिवाळी अधिवेशनांमध्ये राज्य कर्मचाऱ्यांच्या डी.ए बाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याची गोड बातमी हाती लागली आहे .सध्या राज्यातील कर्मचाऱ्यांना सध्या 34 टक्के दराने डी.ए लाभ अनुज्ञेय आहे , यामध्ये माहे जुलै 2022 पासून चार टक्के वाढ लागु होणार असल्याने ,राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांना 38 टक्के दराने डी.ए लागु अनुज्ञेय करण्यात येईल .


4 टक्के डी.ए थकबाकीची रक्कम मिळणार –


राज्यातील कर्मचाऱ्यांना जुलै महिन्यांपासून डी.ए लाभ अनुज्ञेय करण्यात येणार असल्याने , कर्मचाऱ्यांना माहे जुलै ते नोव्हेंबर या कालावधीमधील डी.ए थकबाकी रक्कमेचा लाभ मिळणार आहे .सदरचा चार टक्के वाढीव महागाई भत्ताचा लाभ पेन्शनधारक कर्मचाऱ्यांना देखिल त्वरित लागु करण्यात येणार आहे .

जानेवारी महीन्याच्या वेतनात महागाई भत्ता 4% थकबाकी फरकासह मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्य कर्मचारी संघाने तशी मागणी केली असुन सरकार सकारात्मक पाऊल उचलत आहे. शासन राज्य कर्मचाऱ्यांना लवकरच महागाई भत्ता बाबत शासन निर्णय जाहीर करण्याबाबत चर्चा सुरू आहे असे सुत्रांकडून सांगण्यात आले आहे 

💢मुख्यालय अट रद्द बाबत पंचायत राज कमिटी अध्यक्ष यांचे पत्र येथे सविस्तर वाचा

💢जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत कर्मचारी यांचे आंदोलन सविस्तर येथे वाचा


Post a Comment

0 Comments