Subscribe Us

विशेषण म्हणजे काय :- नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात.

 



विशेषण म्हणजे काय :- नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात.


उदा. चांगला मुलगा , पांढरा बगळा , चार छत्र्या  वगैरे. यांत चांगला , पांढरा , चार  ही विशेषणे आहेत.

विशेषणाचे प्रकार: गुणवाचक विशेषण, संख्यावाचक विशेषण, सार्वनामिक विशेषण

१ 💥 गुणवाचक विशेषण :

नामाचा कोणत्याही प्रकारचा गुण किंवा विशेष माहिती दाखविणाऱ्या विशेषणाला ‘ गुणवाचक विशेषण ‘  असे म्हणतात. उदा.  हिरवे रान शुभ्र ससा निळे आकाश. यांत हिरवे, शुभ्र आणि निळे ही गुणविशेषणे आहेत.

🔸 संख्या विशेषण : ज्या विशेषणांच्या योगाने नामाची संख्या दाखविली जाते त्यास संख्या विशेषण असे म्हणतात.

🔸 संख्या विशेषणाचे पाच प्रकार आहेत.

🔸गणनावाचक संख्या विशेषण

🔸  क्रमवाचक संख्या विशेषण

 🔸आवृत्तीवाचक संख्या विशेषण

🔸 पृथ्वकत्ववाचक संख्या विशेषण

 🔸 अनिश्चित संख्या विशेषण


A गणना वाचक संख्या विशेषण : ज्या विशेषणाचा उपयोग वस्तूची गणती किंवा गणना करण्यासाठी होतो त्या विशेषणाला गणनावाचक विशेषण असे म्हणतात

उदा. दहा मुले, तेरा भाषा, एक तास, पन्नास रुपये यांत दहा, तेरा, एक, आणि पन्नास ही गणनावाचक विशेषणे आहेत. गणनावाचक संख्या विशेषणाचे तीन प्रकार पडतात

 🔶. पूर्णाक वाचक – पाच, सहा, अठरा, बारा.

🔷. अपूर्णाक वाचक – पावशेर, अर्धा, सव्वा, दीड.

🔶. साकल्य वाचक – पाचही मैत्रिणी, दोन भाऊ.

🟣  क्रमवाचक संख्या विशेषण : वाक्यामधील जे विशेषण वस्तूचा क्रम दर्शविते त्या विशेषणाला क्रमवाचक विशेषण असे म्हणतात.

उदा. पहिले दुकान, सातवा बंगला, पाचवे वर्ष 

🟢  आवृत्तिवाचक संख्या विशेषण : वाक्यामधील जे विशेषण संख्येची किती वेळा आवृत्ती झाली ते दर्शविते त्यास आवृत्तिवाचक विशेषण असे म्हणतात.

उदा. तिप्पट मुले, दुप्पट रस्ता, दुहेरी रंग

🔴  पृथ्वकत्ववाचक संख्या विशेषण : जी विशेषणे पृथ्वकत्व म्हणजे वेगळा बोध करून देतात त्यांना पृथ्वकत्ववाचक संख्या विशेषण असे म्हणतात.

उदा. मुलींनी पाच-पाच चा गट करा, प्रत्येकाने चार-चार प्रश्न सोडवा

🟡  अनिश्चित संख्या विशेषण : ज्या विशेषणाद्वारे नामांची निश्चित संख्या किंवा प्रमाण व्यक्त होत नाही अशा विशेषणाला अनिश्चित संख्या विशेषण असे म्हणतात.

उदा. काही मुले, थोडी जागा, भरपूर पाणी

🟣. सार्वनामिक विशेषण : सर्वनामांपासून बनलेल्या विशेषणांना सार्वनामिक विशेषण असे म्हणतात.

उदा. हे झाड, ती मुलगी, तो पक्षी

-----------------------------------------------------------------------------

💢 वरिष्ट वेतन श्रेणी आदर्श प्रस्ताव १२ वर्ष शिक्षक,विषय शिक्षक, मुख्याध्यापक यांना अत्यंत उपुक्त. येथे डाउनलोड करा

💢राज्यात २७ जुलै ते ४ आँगष्ट  व विदर्भात ११ आँगष्ट ते २२ आँगष्ट रोजी होणार सेतू अभ्यासक्रम अध्ययन स्थिती तपासणी परिपत्रक वाचण्यासाठी  येथे क्लिक करा

💢३४% महागाई भत्ता माहित वाचण्यासाठी येथे क्लिक करा

💢बदलीबाबत २५ जुलै चा शासन निर्णय येथे  डाउनलोड करा

💢सेतू उत्तर चाचणी वर्ग १ ते १० येथे डाउनलोड करा

💢जिल्हांतर्गत बदलीबाबत सेवाजेष्ठाता ठरविण्याबाबत २५ जुलै रोजीचा शासन निर्णय वाचण्यासाठी येथे डाउनलोड करा

💢जुलै वेतनवाढ नुसार होणारा चार्ट पे मँट्रीक पिडीएफ येथे डाउनलोड करा
💢शालेय पोषण आहार लेखा परीक्षण रद्द करणेबाबत आमदार कपिल पाटील यांचे शासनास पत्र येथे डाउनलोड करा

💢शिक्षकाना पाठ टाचन काढण्यासाठी सक्ती न करणेबाबत शासन निर्णय येथेडाउनलोड करा
💢जिल्हा शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांची माहिती सादर करणेबाबत शिक्षणाधिकारी यांचे आदेश 
💢जिल्हा शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांची माहिती सादर करणेबाबत शिक्षणाधिकारी यांचे आदेश येथे डाउनलोड करा
💢स्वयंपाकी मदतनीस शापोआ नेमणुकीचा करारनामा करारनामा येथे डाउनलोड करा
💢स्वातंत्र्याचा अमृत महोत्त्सवी कार्यक्रमाअंतर्गत घरघर तिरंगा फडकवण्याबाबत शासन निर्णय येथे डाउनलोड करा

💢शालेय पोषण आहार योजना प्रभावी अमलबजावणी होण्यासाठी भरारी पथक नेमणूक करणेबाबत २२/७/२२ चा शासन निर्णय येथे क्लिक करा

💢मुख्याध्यापक वार्षिक डायरी येथे  क्लिक करा

💢ओबीसी शिष्यवृत्ती  निधी वितरण निर्णय येथे डाउनलोड

💢अपंगाना घरपट्टी सूट बाबत निर्णय येथे क्लिक करा

१]शिक्षक बदली फार्म कसा भरावा क्लिक करा

२]शापोआ लेख परीक्षण शासन निर्णय 👉डाउनलोड करा

३] शापोआ विवरण पत्र येथे👉 डाउनलोड करा
४] निवड श्रेणी प्रशिक्षण निर्णय येथे 👉 डाउनलोड करा
५]१५ जुलै बदली शासन निर्णय येथे डाउनलोड करा
६]१४ जुलै बदली शासन निर्णय येथे डाउनलोड करा
७]CMP प्रणाली वेतन करावयासाठी काळजी कोणती डाउनलोड करा
८]शापोआ इंधन भाजीपाला दरवाढ निर्णय येथे डाउनलोड करा
९] भारतातील फार्मसी कॉलेज येथे डाउनलोड करा


Post a Comment

0 Comments