Subscribe Us

विद्यार्थी व शिक्षकांसाठी आनंदाची बातमी! Festival Holiday दिवाळीच्या सुट्ट्यांमधे वाढ शिक्षण विभागाचा महत्त्वाचा निर्णय

 




विद्यार्थी व शिक्षकांसाठी आनंदाची बातमी! Festival Holiday दिवाळीच्या सुट्ट्यांमधे वाढ शिक्षण विभागाचा महत्त्वाचा निर्णय


दिवाळीच्या सुटीबाबत आधीच्या परिपत्रकानुसार कमी केलेल्या सुट्ट्या शाळांना वाढवून मिळणार. कमी झालेल्या सुट्ट्या वाढवून देण्याचा निर्णय शिक्षणाधिकारी किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी स्थानिक पातळीवर घेणार

               मराठवाड्यातील औरंगाबाद विभागाच्या शिक्षण उपसंचालकांनी दिनांक 13 ऑक्टोबर 2022 रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार त्यांनी औरंगाबाद विभागातील शिक्षण अधिकारी प्राथमिक व माध्यमिक यांना शैक्षणिक वर्ष 2022 23 मधील दिवाळी सुट्ट्यांबाबत औरंगाबाद विभागात एक वाक्यता राहण्यासाठी जालना बीड परभणी हिंगोली व औरंगाबाद या जिल्ह्यांनी दिनांक 22 ऑक्टोबर 2022 ते दिनांक 9 नोव्हेंबर 2022 पर्यंत म्हणजेच एकूण 19 दिवस दिवाळी सुट्ट्या जाहीर करण्याबाबत परिपत्रक निर्गमित करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे जिल्ह्यामध्ये शैक्षणिक वर्ष 2022- 23 साठी दिनांक 22 ऑक्टोबर 2022 ते 9 नोव्हेंबर 2022 या 21 दिवसाच्या कालावधीसाठी दिवाळी सुट्ट्या जाहीर करणे बाबत शिक्षण अधिकारी स्तरावरील स्वतंत्र परिपत्रकानुसार सर्व व्यवस्थापनांना कळविण्याचे निर्देश शिक्षण उपसंचालक यांनी दिले आहेत.

               विदर्भातील अकोला व वाशीम या जिल्ह्यांमध्ये दिवाळीच्या सुट्ट्या ह्या दिनांक 22 ऑक्टोबर 2022 पासून तर दिनांक 7 नोव्हेंबर 2022 पर्यंत एकूण 16 दिवसाच्या सुट्ट्या जाहीर केलेल्या आहेत. इतर जिल्ह्यांतील शिक्षणाधिकारी व मुख्यकार्यकारी अधिकारी हे सुद्धा लवकरच दिवाळी सुट्टीत वाढ करण्याचा निर्णय सकारात्मक घेतील अशी आशा आहे 

          विदर्भातील अमरावती व नागपूर विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी जर औरंगाबाद विभागीय शिक्षण उपसंचालक यांचे प्रमाणे परिपत्रक निर्गमित करून सर्व शिक्षणाधिकारी यांना विभागामध्ये सारख्या सुट्ट्या देणे बाबत निर्देश दिले तर इतर जिल्ह्यांमध्ये देखील दिवाळीच्या सुट्ट्या वाढण्याची शक्यता आहे.

💟💢आठव्या वेतन आयोगात मोठी पगारवाढसविस्तर वाचा  

💢सेवानिवृत्तीचेहवय 60 वर्ष होणार सविस्तर येथे वाचा

Post a Comment

0 Comments