Subscribe Us

शालेय पोषण आहार योजनेंतर्गत तेल अग्रीम व इंधन मानधन मुख्याध्यापक यांच्या खात्यात जमा



शालेय पोषण आहार योजनेंतर्गत तेल अग्रीम व इंधन मानधन मुख्याध्यापक यांच्या खात्यात जमा


 जुलै 2022 पासुन शालेय पोषण आहार योजनेंतर्गत शाळा स्तरावर मध्यान्ह भोजन देताना खिचडीत शिजवून देतांना मुख्याध्यापक यांनी स्वखर्चाने तेल वापर करावा याबाबत निर्णय शासनाने घेतला आहे. व यासाठी जूलै महीन्यात तेलाचे पैसे अग्रीम स्वरूपात दिले होते. परंतू काही तांत्रिक अडचणींमुळे तेल अग्रीम हे मुख्याध्यापक खात्यात जमा झाले नाही. परंतु आता जिल्हा परिषद बुलढाणा यांनी जुलै महिन्याचे तेल अग्रीम रक्कम मुख्याध्यापक खात्यात 2 नोव्हेंबर रोजी जमा केली आहे

   सदर रक्कम ही जुलै 22 महिन्याचीच आग्रीम स्वरूपात आहे, आपण प्रत्यक्ष वापरलेले तेल व यात कदाचित फरक असू शकतो सदर रक्कम ही आग्रीम स्वरूपात आहे ती 75% असून बाकी रक्कम इंधन मानधन स्वरूपात प्राप्त होईल.

   तरी मुख्याध्यापक यांनी आपला स्थानिक खर्चाचा ताळमेळ लावताना ह्या गोष्टी लक्षात घेऊन हिशोब करावा. सदर शापोआ रक्कम मुख्याध्यापक खात्यात जमा करण्यासाठी मुख्याध्यापक संघाने अविरत प्रयत्न केले हे विशेष.



 💢शापोआ मानधन पैसे विभागणी बाबत येथे वाचा

💥18 महीन्यातील महागाई भत्ता बाबत माहिती येथे सविस्तर वाचा

💢जिल्हा अंतर्गत बदली अवघड क्षेत्रातील शाळांची यादी बाबत माहिती येथे सविस्तर वाचा

💢घरभाडे भत्ता व वेतन बंद करण्याबाबत पत्र सविस्तर येथे वाचा

Post a Comment

0 Comments