Subscribe Us

विद्यार्थ्यांसाठी खुशखबर... वर्ग 5 ते 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा फि माफ जिल्हा परिषद शेष फंडातून शिष्यवृत्ती फी भरण्याचे आदेश

 


विद्यार्थ्यांसाठी खुशखबर... वर्ग 5 ते 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा फि माफ जिल्हा परिषद शेष फंडातून शिष्यवृत्ती फी भरण्याचे आदेश 


वर्ग 5 वी ते 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा हि दरवर्षी घेण्यात येत असते यासाठी शासन फि सुध्दा आकारते. खरं कायद्याच्या अनुषंगाने 6 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांना मोफत व सक्तीचे शिक्षण देण्याची जबाबदारी संपूर्णपणे शासनाची आहे. परंतु शिष्यवृत्ती परीक्षा देण्यासाठी बिगर मागास 200 रू व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना 125 रू अशी फि आकारणी करण्यात येते. 

           मुख्याध्यापक महासंघ बुलढाणा यांच्या वतीने दोन वर्षांपासून शिष्यवृत्ती परीक्षा फि माफ करावी याबाबत सातत्याने शिक्षक आमदार रणजित पाटील यांना निवेदन देण्यात आले होते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त शिष्यवृत्ती परीक्षेत सहभागी होण्यासाठी शासनाने शिष्यवृत्ती परीक्षा फि माफ करावी याबाबत सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता शासनाने हा निर्णय घेतल्यामुळे मुख्याध्यापक महासंघ प्रयत्नाला यश मिळाले आहे.

        आयुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांनी  2 नोव्हेंबर 22 च्या आदेशानुसार शिष्यवृत्ती परीक्षा फि व शाळा संलग्नता फि जिल्हा परिषद शेष फंडातून भरावी असे निर्देश देण्यात आले आहे. यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना खुप मोठा दिलासा मिळाला आहे.

💢आयुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचे पत्र येथे डाउनलोड करा

💢अवघड क्षेत्रातील शाळांची यादी येथे डाउनलोड करा

💢संवर्ग 1 बाबत प्रमाणपत्र पडताळणी बाबत आदेश वाचा

💢घरभाडे भत्ता बंद बाबत पत्र सविस्तर येथे वाचा

💢18 महीन्यातील महागाई भत्ता बाबत माहिती येथे सविस्तर वाचा

Post a Comment

0 Comments