Subscribe Us

Good News राज्य कर्मचारी व पेन्शनधारकांना मोठी आनंदाची बातमी ! नोव्हेंबरमधे माहे जुलै 2022 पासुन 38 % दराने महागाई भत्ता वाढ , फरकासह लाभ मिळणार.



Good News राज्य कर्मचारी व पेन्शनधारकांना मोठी आनंदाची बातमी ! नोव्हेंबरमधे माहे जुलै 2022 पासुन 38 % दराने महागाई भत्ता वाढ , फरकासह लाभ मिळणार.


           महाराष्ट्र राज्यातील राज्य शासन सेवेत कार्यरत शासकीय , जिल्हा परिषदा व इतर पात्र कर्मचारी तसचे निवृत्तीवेनधारक कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर वाढीव 4 टक्के महागाई भत्ताचा लाभ मिळणार आहे. सध्या राज्यातील कर्मचाऱ्यांना जानेवारी 2022 पासुन 34 टक्के दरामध्ये डी.ए लाभ अनुज्ञेय करण्यात आलेला आहे. यामध्ये आणखीण 4 टक्के वाढ होणार आहे.


                    सन 2022 या दिवाळी सणामध्ये केंद्र सरकारच्या धर्तीवर अनेक राज्यांनी कर्मचाऱ्यांच्या डी.ए मध्ये वाढ करुन दिवाळी सणाला भेट जाहीर केली. परंतु महाराष्ट्र राज्य सरकारने डी.ए वाढीबाबतचा निर्णय तुर्तास थांबविला आहे. महानगरपालिका नगरपालिका निवडणुक लक्षात घेऊन वित्त विभागात डी.ए वाढीबाबतची प्रक्रिया सुरु असुन राज्यातील कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर माहे जुलै 2022 पासुन वाढीव 4 टक्के महागाई भत्ता नोव्हेंबर महिन्यात अनुज्ञेय करण्यात येईल. शिवाय जुलै 2022 पासुनचा महागाई भत्ता फरक ( डी.ए ) देखिल अनुज्ञेय करण्यात येणार आहे. नुकतेच महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यातील कार्यरत आखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्याच्या महागाई भत्ता मध्ये माहे जुलै 2022 पासुन 4 टक्के वाढ जाहीर केली असून डी.ए फरक देखिल अनुज्ञेय करण्यात आलेला आहे.


                             महाराष्ट्र शासन प्रत्येक वेळी राज्यातील आखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर महागाई भत्ता वाढ जाहीर करण्यात येते. यानंतर एक – दोन महिन्यानंर राज्याची आर्थिक स्थिती लक्ष्यात घेवून राज्य कर्मचारी / पेन्शनधारकांना डी.ए वाढ जाहीर करण्यात येते. यामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांना वाढीव 4 टक्के डी.ए वाढीबाबतचा निर्णय नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. राज्यातील विविध कर्मचारी संघटनांकडुन डी.ए वाढीबाबतचे निवेदन राज्य सरकारला सादर केले आहेत. यासंदर्भात सरकार लवकरच सकारात्मक निर्णय घेणार असुन माहे नोव्हेंबर मधे राज्य कर्मचाऱ्यांना माहे जुलै 2022 पासून डी.ए वाढ लागु करण्यात येईल असे सुत्रांकडून सांगण्यात आले आहे.


💢जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत अपडेट सविस्तर येथे वाचा

💥घरभाडे भत्ता बंद होणार याबाबत सविस्तर येथे वाचा

💢शिक्षक बदली बाबत अपडेट सविस्तर येथे वाचा

Post a Comment

0 Comments